निवडणूकीनंतर ईडीची पहिली कारवाई, बड्या नेत्याच्या घरातून 1 कोटी आणि 100 काडतुसे जप्त

लोकसभा निवडणुकीनंतर ईडी पुन्हा एकदा सक्रीय झाली आहे. ईडी पथकाने बड्या नेत्याचा घरावर छापा टाकला. या छाप्यात ईडीने 1 कोटी रुपये रोख आणि 100 काडतुसे जप्त केली आहेत. या छाप्यामुळे माजी मुख्यमंत्री सोरेन यांची अडचण वाढली आहे.

ईडी (अंमलबजावणी संचालनालय) च्या टीमने झारखंडची राजधानी रांचीमध्ये पुन्हा एकदा छापा टाकला आहे. जमीन व्यावसायिक कमलेश कुमार यांच्या चेशायर होम रोड आणि कानके येथील घरांवर हा छापा टाकण्यात आला. ईडीने कमलेश यांच्या घरी जमीन घोटाळ्याशी संबंधित अनेक कागदपत्रांची झडती घेतली. तपासादरम्यान ईडीला त्यांच्या काणके येथील राहत्या घरातून 1 कोटी रुपये रोख, एक पिस्तूल आणि 100 जिवंत काडतुसे सापडली. ईडीने मिळालेल्या वस्तू जप्त केल्या आहेत. ईडीची टीम आता 1 कोटी रुपये कुठून आणले याची चौकशी करत आहे.

ईडीने काही दिवसांपूर्वीच जमीन व्यावसायिक कमलेश यांना समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, समन्स बजावूनही ईडीच्या कार्यालयात उत्तर देण्यासाठी ते हजर झाले नाही. त्यामुळे ईडीने त्यांच्या घरावर छापा टाकला. जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने जमीन व्यावसायिक शेखर कुशवाह यांना अटक केली होती. सध्या तो अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत आहे. कुशवाह यांच्यापाठोपाठ कमलेश यांच्यावरही ईडीचा चाप पडल्याने हा माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना मोठा धक्का मानला जात आहे.

जमीन घोटाळ्याशी संबंधित प्रकरणाची ईडी टीम सातत्याने चौकशी करत आहे. या प्रकरणी आतापर्यंत माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन, रांचीचे माजी उपायुक्त छवी रंजन, महसूल कर्मचारी भानू प्रताप यांच्यासह अनेकांना अटक करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. त्यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्जही केला होता. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे.

जमीन घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अंतू तिर्की या व्यक्तीने अंमलबजावणी संचालनालयासमोर जमीन विकून कोट्यवधी रुपये कमावले. बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने जमिनीचा व्यवसाय केल्याची कबुली दिली आहे. तसेच या प्रकरणात सामील असलेल्या लोकांची नावेही त्याने उघड केली आहेत.

Leave a Comment