बारामतीकरांचा कौल शरद पवारांच्या कन्येला, सुनेला नापसंती……

इतिहासात पहिल्यांदाच बारामतीमध्ये पवार विरूद्ध पवार असा सामना निवडणुकीच्या निमित्ताने रंगल्याचे पाहायला मिळाला. त्यामुळे राज्यातील बारामती लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. अशातच हाय व्होल्टेज बारामती मतदारसंघामधून धक्का देणारा एक्झिट पोल समोर आला होता. त्याप्रमाणेच लोकसभेचा निकाल समोर आला आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गट राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या आहे. सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गट राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा तबब्ल १ लाखांहून अधिक मतांनी पराभव केला आहे. आज सकाळपासून निवडणुकीच्या कलांमध्ये सुप्रिया सुळे या आघाडीवरच असल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघाच्या या निकालामुळे अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. राज्यातील बारामती लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. अशातच हाय व्होल्टेज बारामती मतदारसंघामधून धक्का देणारा एक्झिट पोल समोर आला होता. Tv9 च्या पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार, सुनेत्रा पवार पिछाडीवर तर सुप्रिया सुळे या आघाडीवर होत्या. या एक्झिटपोलच्या अंदाजानुसारच लोकसभेचा निकाल समोर आला आहे.

Leave a Comment