ठाणे जिल्ह्यातील एका मोठ्या मनसे नेत्यावर खंडणी मागितल्याचा आरोप आहे. त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरु असताना इतका मोठा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका नेत्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हा नेता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा निकटवर्तीय, विश्वासू मानला जातो. मनसे नेते अविनाश जाधव यांच्या विरोधात लोकमान्य टिळक पोलीस ठाण्यात खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. एका सराफाकडून 5 कोटींची खंडणी मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
अविनाश जाधव हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष आहेत. मुंबईत एका व्यापाऱ्याला खंडणीसाठी धमकावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांच्यासोबत ठक्कर नावाचा एक इसमही या प्रकरणात आरोपी आहे. खंडणी मागणे, कट रचणे आणि जीवे मारण्याची धमकी या कलमांखाली त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय.
अविनाश जाधव हे नेहमी चर्चेत.
अविनाश जाधव यांच्यावर कारवाई होऊ शकते. झवेरी बाजारातील एका सोने व्यापाऱ्याला धमकावल्याचा आरोप आहे. अविनाश जाधव हे नेहमी चर्चेत असतात. मनसेकडून करण्यात येणाऱ्या विविध आंदोलनात ते सक्रीय असतात. जनसामान्यांचे प्रश्न त्यांनी नेहमीच आक्रमकपणे उचलून धरले आहेत.