लोकसभा निवडणुकीचे निकल काल जाहीर झाले त्यानंतर आज बीजेपी चे नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
पक्षाच्या अपयशाची जबाबदारी स्वीकारत त्यांनी विधानसभेसाठी पूर्णवेळ काम करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या या निर्णयावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही, परंतु पक्षाच्या अंतर्गत गटांमध्ये उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणूक 2024 मध्ये देशात एन डी ए ला अपेक्षित यश मिळालं नाही राज्यात इंडिया आघाडीच्या गटात पक्षाने चांगली कामगिरी केल्याचं पहायला मिळालं या दरम्यान लोकसभा निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाल्यानंतर आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अपेक्षेप्रमाणे यशस्वी मिळाल्यानंतर फडणवीस यांनी ही इच्छा बोलून दाखवली आहे लोकसभा निवडणूक निकालाचे विश्लेषण करण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते त्यावेळी त्यांनी पक्षाच्या अपयशाची जबाबदारी स्वीकारली
फडणवीस काय म्हणाले.?
जो पराभव झाला जागा कमी आल्या याची जबाबदारी मी स्वीकारतो मी मान्य करतो मी कुठेतरी कमी पडलो आणि ती कमतरता भासून काढण्याचा प्रयत्न करणार आहे भाजपला महाराष्ट्रात जी बिचारी सहन करावी लागली त्याची सर्व जबाबदारी मी स्वीकारतो मी पक्षाला विनंती करतो की आता मला विधानसभे करता पूर्ण वेळ उतरायचे आहे त्यामुळे भाजप पक्षाच्या नेतृत्वाला विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधून मोकळ करावं आणि पक्षांमध्ये पूर्ण वेळ काम करण्याची संधी द्यावी ज्यामुळे राहिलेले कमतरता पूर्ण करण्यासाठी मला वेळ देता येईल असं फडणवीस यावेळेस म्हणाले बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही करायचं आहे ती आमची टीम करेल त्यांच्यासोबत मी असणार आहे यासंबंधी पक्षातील वरिष्ठांशी मी भेटणार आहे आणि ते सांगतील ते मी करेन असेही फडणवीस या वेळेस म्हणाले
राज्यात मवीआ मुसंडी
4 जून रोजी जाहीर झालेल्या निकालानंतर फडणीस यांनी आपण कुठेतरी कमी पडल्याचे मान्य केलं आहे दरम्यान दुसरीकडे राज्यात महाविकास आघाडीला लोकसभा निवडणूक मोठा यश मिळाल्याचं पाहायला मिळालं राज्यात भाजप प्रणित एनडीएला 17 जागा जिंकता आल्या यामध्ये भाजप 9,शिवसेना शिंदे गट 7 , राष्ट्रवादी अजित पवार गट 1 जागा मिळाली तर इंडिया आघाडी मधील काँग्रेस 13 ,शिवसेना उद्धव ठाकरे गट 9 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 8 जागा जिंकल्या आहे .