राज्यातील पोलीस भरती २०२४ प्रक्रिया सुरु आहे. या भरतीत अनेक लाखो उमेदवारांची मैदानी चाचण्या पार पडल्या आहेत. आता लेखी परीक्षेला सुरुवात होणार आहे..
राज्यात पोलीस भरती २०२४ प्रक्रीया सुरु आहे. या पोलीस भरतीत मैदानी चाचण्या घेतल्या जात आहेत. १९ जूनपासून पोलीस भरती सुरु आहे. परंतू या पोलीस भरतीत आता मैदानी चाचण्यात तरुणांना जादा गुण येण्यासाठी स्टीरॉईड जवळ बाळगल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात चार उमेदवारांवर गुन्हा दाखल केला आहे. एकूण १७ हजार पदासाठी १७ लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. मीरा-भाईदर, वसई- विरार पोलीस आयुक्तालया मार्फत २३१ पोलीस शिपाई पदांसाठी राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेची मैदाणी चाचणी पारदर्शकरित्या संपन्न झाल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांनी दिली आहे. ७ जुलै रोजी लेखी परीक्षा राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तानी दिली आहे.
मीरा-भाईदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या मार्फत राबवण्यात येणारी भरती पारदर्शकरित्या संपन्न झाली आहे. पारदर्शक पणे भरती पार पडावी यासाठी लाचलूचपत विभाग, नार्कोटिक्स विभाग, देखील मैदानात उपस्थित होते. कोणत्याही प्रकारच्या उत्तेजक पदार्थांचे सेवन मैदाणी चाचणीला येताना उमेदवारांनी करू नये असे आयुक्तालयाच्या मार्फत सांगण्यात आले होते. मात्र मैदानी चाचणीला येताना चेकिंग दरम्यान ०४ पुरुष उमेदवार यांनी मैदानी चाचणी दरम्यान चांगले गुण मिळवण्यासाठी स्टीरॉईड सोबत बाळगल्याचे निष्पन झाले आहे. त्या चारही उमेदवारांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे.
महिला उमेदवाराला चक्कर आली
मैदानात चाचणी दरम्यान एक महिला चक्कर आल्याने बेशुद्ध पडल्याची देखील घटना घडली होती. मात्र रुग्णवाहिका, डॉक्टर सर्व सोय उपलब्ध असल्याने लगेच उपचार मिळाला आहे. पावसामुळे १९ जूनपासून सुरु झालेली मैदाणी चाचणी प्रक्रिया तात्पुरती स्थगित करून नंतर २५ जून ते १ जुलै २०२४ पर्यंत सदर मैदानी चाचणी मीरारोड पूर्वच्या पालिकेच्या मैदानात राबवण्यात आली आहे. २३१ पोलीस शिपाई पदांसाठी ८०४९ अर्ज आले होते. मैदानी चाचणी करीता एकूण ६०४० उपस्थित होते. त्यात पुरुष ४८७७ तर १५३५ महिला उमदेवारांचा समावेश होता. १/१० अश्या प्रमाणात लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. मीरारोड पूर्व येथील तिवारी कॉलेजमध्ये लेखी परीक्षा चाचणी घेण्यात येणार आहेत.