धावत्या कारवर गोळीबार, भुसावळमध्ये माजी नगरसेवकाची निर्घृण हत्या

भुसावळमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भुसावळ मध्ये गोळीबार करून दोन जणांचा खून करण्यात आला. धावत्या कारवर गोळीबार करून हल्लेखोरांनी दोघांना संपवलं. यामुळे भुसावळ शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस आणि शीघ्र कृती दलाच्या जवानांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे

राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. पुण्यातील ड्रिंक अँड ड्राइव्हची घटना ताजी असतानाच राज्यातही विविध ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत. त्यावरूनच वातावरण तापलेलं असातानाच आता जळगावच्या भुसावळमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भुसावळ मध्ये गोळीबार करून दोन जणांचा खून करण्यात आला. माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे या दोघांची गोळीबार करून करण्यात हत्या करण्यात आली आहे. पूर्ववैमनस्य आणि जुन्या वादातू हे हत्याकांड घडलं असून त्यांमुळं संपू्र्ण भुसावळ शहरच हादरलं आहे. बुधवारी रात्री हा खळबळजनक प्रकार घडला असून मारेकऱ्यांच्या शोधार्थ पोलिसांचे पथक ठिकठिकाणी रवाना झाले आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे हे दोघेही कारमधून जात असताना पाठलाग करणारे मारेकरी मागून आले आणि त्यांनी या दोघांवरही बंदुकीतून गोळीबार केला. मारेकऱ्यांनी त्यांच्यावर १० ते १५ राऊंड फायर केल्याची माहिती आहे. या दुर्दैवी घटनेत संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांचा मृत्यू झाला. यामुळे भुसावळ शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस आणि शीघ्र कृती दलाच्या जवानांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले आणि दोघांचे मृतदेह रात्रीच पोलीस बंदोबस्तात जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. जिल्हा रुग्णालयात रात्री तीन वाजेपर्यंत प्रचंड गर्दी होती.

दरम्यान भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी रात्रीच जिल्हा रुग्णालयात येऊन नातेवाईकांची भेट घेतली होती. मयत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी आमदार संजय सावकारे यांच्यावर संताप व्यक्त करत प्रचंड आक्रोश केला. संतोष बारसे आणइ सुनील राखुंडे यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम झाल्यानंतर त्यांचे पार्थिव भुसावळ शहरात नेण्यात येणार असून पोलीस बंदोबस्तात दोघांवर भुसावळ शहरात अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्यावर हल्ला नेमका कोणी केला, त्यात कोण-कोण सामील होतं याचा पोलीस कसून शोधत घेत असून मारेकऱ्यांच्या शोधार्थ पोलिसांचे पथक ठिकठिकाणी रवाना झाले आहे.

Leave a Comment