धरणावर फिरण्याचा बेत पडला महागात, पाण्यात उतरल्यानंतर चेष्टा मस्करी करताना गमावला जीव

अंगतकुमार लखन गुप्ता आणि त्याच्या मित्रांनी गुगलवर पर्यटनाचे ठिकाण शोधले. त्यानंतर भर उन्हात जाधववाडी धरण परिसरात फिरायला आले. धरणावर पोहचल्यानंतर त्यांनी पाण्यात पोहण्याचा आनंद घेतला. मात्र पाण्यात चेष्टा मस्करी करताना एका खोल खड्ड्यात चौघांचा पाय रुतला.

पुणे शहरात राहणाऱ्या चार पर्यटकांनी पर्यटनाचा बेत आखला. पुणे शहरातील तापमान ४० अंशावर गेले असताना चौघांना धरणाच्या थंड ठिकाणी जाण्याची योजना आखली. त्यानंतर मावळातील जाधववाडी धरणावर जाण्याचे ठरवले. परंतु त्यातील एकाचे हे शेवटचे पर्यटन ठरले. पाण्यात उतरल्यावर चौघांचा पाय खड्ड्यात रुतला. त्यानंतर त्यांनी जिवाच्या भीतीने आरडाओरडा सुरु केली. स्थानिक लोकांनी तिघांना वाचवले. परंतु त्यातील एकाचा मृत्यू झाला. फिरण्याचा आखलेला बेतामुळे एकाने आपला जीव गमवला. अंगतकुमार लखन गुप्ता (वय 26, रा. कोथरूड, पुणे. मूळ रा. अमृतसर, पंजाब) असे मृत्यू झालेल्या पर्यटकाचे नाव आहे.

अशी घडली घटना

अंगतकुमार लखन गुप्ता आणि त्याच्या मित्रांनी गुगलवर पर्यटनाचे ठिकाण शोधले. त्यानंतर भर उन्हात जाधववाडी धरण परिसरात फिरायला आले. धरणावर पोहचल्यानंतर त्यांनी पाण्यात पोहण्याचा आनंद घेतला. मात्र पाण्यात चेष्टा मस्करी करताना एका खोल खड्ड्यात चौघांचा पाय रुतला. त्यांनी जिवाच्या भीतीने आरडाओरडा सुरु केली. त्यांचा आवाज ऐकल्यावर स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी पोहचले. त्यांनी तिघांना वाचवले. मात्र अंगतकुमार लखन गुप्ता या पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला.

घटनास्थळी NDRF ची टीम

घटनास्थळी वन्यजीव रक्षक मावळ टीम आणि NDRF च्या जवानांची टीम दहा मिनिटांत पोहचली. त्यांनी पानबोटींच्या सहाय्याने अंगतकुमार गुप्ताचा मृतदेह शोधून काढला. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेची आपत्ती व्यवस्थापन समिती, आपदा मित्र मावळ यांच्यासह शिवदुर्ग मित्र लोनावळाचे निलेश गराडे, अविनाश कार्ले, गणेश निसाळ, सर्जेस पाटील, अनिश गराडे, शुभम काकडे, सुरज शिंदे, विनय सावंत, गणेश गायकवाड, गणेश सोंडेकर, राजेंद्र बांडगे, कमल परदेशी, विक्रांत चौधरी, एनडीआरएफ, तळेगाव एमआयडीसी पोलीस आणि ग्रामस्थांनी शोधकार्यात मदत केली.

पाण्यात उतरताना काळजी घ्या

पर्यटनासाठी अनेक जण पाणी असणाऱ्या ठिकाणी जातात. त्यानंतर पाण्यात मनसोक्त विहार करण्याचा आनंद घेतात. परंतु त्या ठिकाणी असलेली खोली माहीत नसते. यामुळे पर्यटनासाठी जाताना पाण्यात उतरताना काळजी घेणे गरजेचे आहे. स्थानिक लोकांची समंती दिल्यावरच पाण्यात उतरल्यास संकट टळणार आहे.

Leave a Comment