दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील गँगकडून एकनाथ खडसे यांना धमकी……..

eknath khadse dawood ibrahim: छोटा शकील आणि दाऊद इब्राहिम तुम्हाला मारणार आहे, असे धमकी देणाऱ्याने पहिल्यांदा फोनवरुन सांगितले. त्यानंतर खडसे यांनी तो प्रकार गंभीरतेने घेतला नाही. त्यानंतर दुसऱ्या फोनवरुन पुन्हा फोन आला की तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही काहीच केले नाही.

सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले आमदार एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. चार वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरुन त्यांना धमकी आली आहे. यासंदर्भात एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर तक्रार दाखल केली आहे. ही धमकी कुख्यात गुंड आणि मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील गँगकडून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. यापूर्वी दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील गँगकडून एकनाथ खडसे यांना धमकी आली होती. १५ आणि १६ एप्रिल रोजी हे फोन आले होते.

काय दिली धमकी

छोटा शकील आणि दाऊद इब्राहिम तुम्हाला मारणार आहे, असे धमकी देणाऱ्याने पहिल्यांदा फोनवरुन सांगितले. त्यानंतर खडसे यांनी तो प्रकार गंभीरतेने घेतला नाही. त्यानंतर दुसऱ्या फोनवरुन पुन्हा फोन आला की तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही काहीच केले नाही. तुम्हाला ही लोक मारणार आहेत. चार ते पाच वेळा असे फोन आल्यानंतर एकनाथ खडसे यांनी तक्रार दाखल केली आहे. हे फोन अमेरिका आणि उत्तर प्रदेशातून लखनऊमधून आल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्या प्रकरणाशी संबंध…

एकनाथ खडसे यांनी सांगितले की, मला चार ते पाच फोन आले आहेत. त्यानंतर मुक्ताईनगर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. परंतु हे प्रकरण मला गंभीर वाटत नाही. मला त्यात तथ्य वाटत नाही. पोलीस या प्रकरणात चौकशी करतील. त्यात काय येणार? ते पाहू या. एकनाथ खडसे यांना काही वर्षांपूर्वी दाऊदकडून धमक्या आल्या होत्या किंवा दाऊदच्या पत्नीशी त्यांचे संभाषण झाले होते? असे आरोप झाले होते. त्या प्रकरणाचा आता आलेल्या धमक्या प्रकरणाशी काही संबंध आहे का? यावर खडसे म्हणाले, दाऊदच्या पत्नीशी संभाषण प्रकरणात एक व्यक्ती सापडला होता. त्याला पोलिसांनी अटक केली होती.स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरु केला आहे. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही बाब सांगितली आहे. त्यात काही गंभीर प्रकरण आढळल्यास गृहमंत्र्यांनी लक्ष द्यावी, अशी मागणी आपण करणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले.

Leave a Comment