पुण्यात झिकाचा आणखी एक रुग्ण आज आढळला आहे. एरंडवाने भागातच हा रुग्ण आढळला आहे. विशेष म्हणजे याच भागात दोन दिवसांपूर्वी दोन रुग्ण आढळले होते. दोन दिवसांपूर्वी एक डॉक्टर आणि त्याच्या मुलीला झिकाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती.
पुणे शहरातील एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पुण्यात झिका व्हायरसची लागण झालेला आणखी एक रुग्ण आढल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. झिकाचे रुग्ण आढळल्यामुळे पुणे महापालिका अॅक्शन मोडवर आली आहे. पुणे महापालिकेकडून आता सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे. तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. राज्यात पावसाळा सुरु झाला आहे. पाऊस सुरु झाल्यानंतर काही ठिकाणी पाणी साचतं. या पाण्यामुळे विविध डास तिथे येतात. या डासांमुळे डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया सारखे आजार होतात. याशिवाय आता पुण्यात झिका व्हायरसचा सुद्धा शिरकाव झाला आहे. एडिस डास चावल्यामुळे झिका विषाणूचा संसर्ग होतो. पुण्यात या विषाणूने संकर्मित झालेल्या रुग्णांची संख्या 3 झाली आहे.
पुण्यात झिकाचा आणखी एक रुग्ण आज आढळला आहे. एरंडवाने भागातच हा रुग्ण आढळला आहे. विशेष म्हणजे याच भागात दोन दिवसांपूर्वी दोन रुग्ण आढळले होते. दोन दिवसांपूर्वी एक डॉक्टर आणि त्याच्या मुलीला झिकाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. यानंतर आता आणखी एक झिका व्हायरसचा रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळ पुणेकरांमध्ये चिंतेचं वातावरण तयार झालं आहे. झिका आजारामुळे फार मोठा गंभीर परिणाम होत नाही. त्यामुळे घाबरुन जाण्याची गरज नाही. पण नागरिकांनी काळजी घेणं जास्त आवश्यक आहे. तसेच योग्यवेळी उपचार करणं देखील जास्त आवश्यत आहे. विशेषत: गर्भवती महिलांनी जास्त काळजी घेणं जरुरीचं आहे.
कॉलरा आजारही पसरवतोय हातपाय
दरम्यान, देशातील अनेक भागांमध्ये पाऊस पडल्यानंतर आता काही ठिकाणी कॉलरा आजाराने बाधित असलेले रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये कॉलरा आजाराने बाधित रुग्णांची संख्या आता वाढताना दिसत आहे. कॉलरा हा आजर देखील अतिशय गंभीर आजार आहे. या आजारावर योग्यवेळी उपचार केला नाही तर रुग्णाचा जीवदेखील जाण्याची भीती असते. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. दूषित पाण्याने जेवण बनवलं असेल तर त्यातून या आजाराची बाधा होऊ शकते. तसेच दूषित पाण्याने निर्माण झालेला भाजीपाला खाल्ल्यानेदेखील या आजाराची लागण होऊ शकते. तसेच दूषित पाणी पिल्यानेदेखील आजाराची लागण होते. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना पावसाळ्यात विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे.