शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील गाडीचा भीषण अपघात झाला आहे. अकोला जिल्ह्यातल्या पातूर शहराजवळ हा अपघात झाला आहे. अपघातामध्ये किरण सरानाईक यांचे पुतणे रघुवीर सरनाईक यांचा मृत्यू झाला आहे.
शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील गाडीचा शुक्रवारी दुपारी भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील व्यक्तींसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर शहराजवळ हा अपघात झाला आहे. अपघातामध्ये किरण सरानाईक यांचे पुतणे रघुवीर सरनाईक यांचा मृत्यू झाला आहे. अपघातामध्ये जखमी झालेल्या लोकांना अकोल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन गाड्यांची समोरासमोर धडक झाल्यामुळे हा अपघात झाला आहे.
दोन कारची समोरासमोर जोरदार धडक झाल्यामुळे हा अपघात झाला आहे. कारमधून किरण सरनाईक यांचा भाऊ, भावाचा मुलगा, मुलगी आणि नात प्रवास करत होते. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही कारचा चक्काचूर झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
मृतांमध्ये या लोकांचा समावेश
वाशिम रोडवर दोन कारची एकमेकांना जोरदार धडक बसल्यानं ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. या अपघातात किरण सरानाईक यांचे पुतणे रघुवीर सरनाईक (वय २८) यांचा मृत्यू झाला आहे. तसेच शिवाजी आमले (वय ३०) सिद्धार्थ यशवंत इंगळे (वय ३५), तसेच एका नऊ महिन्यांच्या मुलासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये तीन जण जखमी झाले आहे. त्यात पियुष देशमुख (वय ११), सपना देशमुख आणि श्रेयस इंगळे यांचा समावेश आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु झाले आहे.
गावकऱ्यांची मदतीसाठी धाव
अपघाताची माहिती मिळताच मदतीसाठी गावकऱ्यांनी धाव घेतली. तातडीने रुग्णवाहिका आणि पोलिसांना अपघाताची माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यावर मदतकार्य सुरु झाले. रुग्णांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.