Pune Traffic Changes: गोळीबार चौकातून डावीकडे वळून सी.डी.ओ.चौकापुढे उजवीकडे वळून गिरिधर भवन चौक- उजवीकडे वळून सेव्हन लव्हज चौकातून इच्छित स्थळी जाता येईल.
रमझान ईदनिमित्त पुण्यात वाहतुकीत बदल, पर्यायी मार्ग कोणते?
Pune Traffic Changes: गोळीबार चौकातून डावीकडे वळून सी.डी.ओ.चौकापुढे उजवीकडे वळून गिरिधर भवन चौक- उजवीकडे वळून सेव्हन लव्हज चौकातून इच्छित स्थळी जाता येईल.पुणे, ता. १० : रमझान ईदनिमित्त गोळीबार मैदान येथील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधव नमाज पठणासाठी मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे या परिसरात गुरुवारी (ता. ११) सकाळी सहा ते नमाज पठण होईपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे.
हडपसरकडून गोळीबार मैदानमार्गे स्वारगेटकडे जाणारा रस्ता आणि कोंढव्यातून पुलगेटला जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असून, वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. गोळीबार मैदान चौकातून स्वारगेटकडे जाणारा मार्ग बंद राहील.
पर्यायी मार्ग – गोळीबार चौकातून डावीकडे वळून सी.डी.ओ.चौकापुढे उजवीकडे वळून गिरिधर भवन चौक- उजवीकडे वळून सेव्हन लव्हज चौकातून इच्छित स्थळी जाता येईल.
सीडीओ चौक ते गोळीबार मैदान चौकाकडे येणारी वाहतूक बंद राहील.
पर्यायी मार्ग – लुल्लानगरकडून खाण्या मारुती चौकाकडे जाणारी वाहतूक खटाव बंगला चौक- नेपियर रस्ता- मम्मादेवी चौक किंवा वानवडी बाजार चौक- भैरोबानाला येथून किंवा गिरीधर भवन चौकातून इच्छित स्थळी जाता येईल.
सेव्हन लव्हज चौकाकडून गोळीबार मैदानाकडे येणारी वाहतूक बंद राहील.
पर्यायी मार्ग- सॅलिसबरी पार्क – सी.डी.ओ. चौक – भैरोबानाला येथून इच्छित स्थळी जातील.
सोलापूर रस्त्याने मम्मादेवी चौकाकडे येणाऱ्या वाहनांना गोळीबार मैदानाकडे जाण्यास बंदी राहील.
पर्यायी मार्ग- वाहने मम्मादेवी चौक, बिशप स्कूलमार्गे किंवा कमांड हॉस्पिटलमार्गे वळून पुढे किंवा नेपियर रस्त्याने इच्छित स्थळी जातील.
भैरोबानाला ते गोळीबार मैदानाकडे जाणारी वाहतूक भैरोबानाला येथून वळविण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग- भैरोबानाला ते एम्प्रेसगार्डन मार्गे किंवा लुल्लानगरमार्गे वाहतूक सोडण्यात येईल.
कोंढवा परिसरातून गोळीबार मैदानाकडे येणाऱ्या सर्व जड,अवजड मालवाहतूक वाहने, प्रवासी आणि पीएमपी बसेस यांना प्रवेश बंद राहणार आहे.
पर्यायी मार्ग- लुल्लानगर चौकातून भैरोबानाला चौक किंवा गंगाधाम चौकातून इच्छित स्थळी जातील.
याशिवाय कोंढवा आणि शहरातील इतर भागातील ईदगाह मैदानावर नमाज पठण होणार आहे. त्या भागातील वाहतूक परिस्थितीनुसार वळविण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली. शहरात १४१ मशिदीत होणार नमाज पठण– गोळीबार मैदान, हडपसर, पर्वती दर्शन आणि खडकी येथील ईदगाह मैदानांसह १४१ मशिदीत नमाज पठण होणार आहे. सकाळी 7 ते 11:30 या कालावधीत नमाज पठण करण्यात येणार आहे, अशी माहिती रविवार पेठेतील हिलाल कमिटीकडून (चाँद कमिटी) देण्यात आली.