व्लादिमीर पुतिन यांनी पाचव्यांदा रशियाच्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली आहे. पुतिन यांनी जगाला संदेश दिलाय की, ते रशियाचे शक्तीशाली नेते होते आणि अजून पुढची काहीवर्ष तेच रशियाचे सर्वेसर्वा राहणार आहेत. 1992 पासून 2024 पर्यंत पुतिन यांनी पोलादी, कणखर नेतृत्व म्हणून स्वत:ची प्रतिमा निर्माण केलीय. आज युरोपसह अमेरिकेला नडण्याची ताकद असलेला हा जागतिक नेता आहे. पुतिन यांचा इतिहास पाहिला तर, ते एक गुप्तहेर होते. KGB मध्ये असताना, त्यांनी अनेक ऑपरेशन्स केली आहेत. 1991 मध्ये सोवियत युनियनच विघटन झालं. त्यानंतर KGB चे अनेक एजंट्स पाश्चिमात्य देशात आश्रयाला गेले. काहींनी डबल एजंटची भूमिका स्वीकारली. पण पुतिन यांनी देशासोबत गद्दारी केली नाही. हीच त्यांची खासियत त्यांना राजकारणात घेऊन आली.
1952 साली एका साधारण कुटुंबात व्लादिमीर पुतिन यांचा जन्म झाला. त्यांचे वडील सोवियत युनियनच्या नेवीमध्ये नोकरीला होते. त्यांची आई एका छोट्याशा फॅक्टरीत कामाला होती. 1975 साली त्यांनी रशियन गुप्तचर यंत्रणा केजीबी जॉइंन केली. एक-एक पायरी चढत ते एजंटपासून सीक्रेट ऑफिसर बनले. 1989 साली जर्मनी रशियाच्या विरोधात जाऊ लागला, तो रशियासाठी सर्वात मोठा बदल होता. जर्मनीवर आधी रशियाचा प्रभाव होता. बर्लिनची भिंत तुटल्यानंतर जर्मनी पूर्णपणे अमेरिकेच्या बाजूने गेला. रशिया त्यावेळी सोवियत युनियन म्हणून ओळखला जायचा. या युनियनमध्ये एकूण 15 देश होते. युनियनच्या विघटनानंतर हे सर्व देश वेगळे झाले. त्यावेळी यूएसएसआरमध्ये एस्टोनिया, लातविया, लिथुआनिया, युक्रेन, मोलडोवा, बेलारूस, जॉर्जिया, आर्मेनिया, अजरबैजान, कजाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उज्बेकिस्तान हे देश होते. यात सगळ्यात मोठा देश रशिया होता.
मग, एंट्री झाली ती, व्लादिमिर पुतिन यांची
सोवियत युनियन फुटला त्यावेळी मिखाइल गोर्बाचेव रशियाचे राष्ट्रपती होते. ते रशियाचे सर्वात अयशस्वी राष्ट्रपती ठरले. त्यांनी 1989 साली अफगाणिस्तानात तालिबानला कंट्रोल करण्यासाठी सैन्य पाठवलं. पण उलट झालं. रशियन सैन्यालाच तिथून पळाव लागलं. बर्लिनची भिंत तुटली, गोर्बाचेव ते सुद्धा रोखू शकले नाहीत. 1991 साली यूएसएसआर फुटला. अखेर मिखाइल गोर्बाचेव यांना आपलं पद सोडावं लागलं. त्यांच्याजागी बोरिस येल्त्सिन रशियाचे राष्ट्रपती बनले. बोरिस येल्त्सिन यांना असं वाटायच की, रशियात सरकारी तंत्र फालतू आहे. त्यामुळे सरकावर खूप दबाव येतो. अमेरिकेसारखी प्रगती करायची असेल, तर खासगीकरण गरजेच आहे, बोरिस यांचं मत होतं. बोरिस येल्त्सिन यांन सरकारी मशीनरी बंद करुन खासगीकरणाला सुरुवात केली. पण याचा उलटा परिणाम झाला. अर्थव्यवस्था अजून कोलमडली. लोकांचे रोजगार गेले. येल्त्सिन यांचा विरोध सुरु झाला. त्यानंतर एंट्री झाली ती, व्लादिमिर पुतिन यांची.
पुतिन यांनी लोकांवर कशी छाप उमटवली?
1991 मध्ये व्लादिमीर पुतिन सैन्यात लेफ्टनेंट कर्नल बनले होते. अनातोली सोबचाक हे सेंट पीटर्सबर्ग या रशियातील सर्वात मोठ्या शहराचे महापौर होते. पुतिन यांची सोबचाक यांच्याबरोबर भेट झाली. त्यांनी पुतिन यांना सेंट पीटर्सबर्ग शहराच उपमहापौर बनवलं. उपमहापौर पदावर विराजमान होताच पुतिन यांनी भ्रष्टाचार संपवला. सिस्टिममध्ये सुधारणा झाली. रस्त्यावर परिवर्तन दिसू लागलं. तिथून रशियात व्लादिमीर पुतिन यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. ते वेगाने पुढे आले. त्यावेळी वॅलेन्टिन बोरिसोविच युमाशेव रशियन राष्ट्रपतींचे सल्लागार होते. बोरिस यांचे ते जावई होते. त्यांनी पुतिन यांना बोलावलं. पुतिन राष्ट्रपीत बोरिस यांचे सल्लागार बनले. त्यानंतर पुतिन आणि बोरिस यांची पक्की मैत्री झाल. हळूहळू पुतिन यांचा रशियन राजकारणात प्रभाव वाढला. राष्ट्रीय राजकारणात त्यांची प्रतिमा उंचावली.
एन्काऊंटरच लाइव्ह टेलिकास्ट दाखवलं
यूएसएसआरमधून 15 देश फुटले होते. पुतिन पंतप्रधान बनल्यानंतर 1999 साली चेचन्याला सुद्धा रशियापासून वेगळं व्हायच होतं. याच दरम्यान ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान रशियन शहर मॉस्कोमध्ये सीरियल बॉम्बस्फोट झाले. जवळपास 300 नागरिकांचा मृत्यू झाला. रशियन लोकांच्या मनात चेचन्या बद्दल राग भरला होता. बोरिस येल्त्सिन दारुच्या आहारी गेले होते. पुतिन यांच्याकडे हा विषय सोपवण्यात आला. पुतिन यांनी चेचन्या विरोधात सैन्य उतरवलं. प्रत्येक सैनिकाच्या डोक्यावर असलेल्या हेलमेटवर कॅमेरा बसवला. थेट Action ची लाइव टेलिकास्ट दाखवलं. 300 नागरिकांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी पुतिन यांनी 80 हजार लोकांना मारलं. पुतिन यांची ही धमक, धडाडी पाहून रशियन राजकारणात त्यांची लोकप्रियता अजून वाढली. 1999 मध्ये पुतिन पंतप्रधान होते. ते राष्ट्रपतींपेक्षा जास्त फेमस झाले. बोरिस यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप वाढत होते. त्यावेळी सन 2000 मध्ये पुतिन पहिल्यांदा राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकले. त्यानंतर पुतिन यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. आपल्या सत्तेला कुठल आव्हान निर्माण होणार नाही, याची त्यांनी काळजी घेतली. पुतिन यांनी संविधानात संशोधन केलं असून 2036 पर्यंत तेच रशियन राष्ट्रपतीपदावर कायम राहणार आहेत.