1993 मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची कोल्हापूर तुरुंगात निर्घूण हत्या, कोणी संपवलं?

कोल्हापूर कारागृहातून मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. 1993 साली मुंबईध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामधील एका आरोपीची कोल्हापूर कारागृहात पाच जणांनी मिळून हत्या केली आहे. नेमकी कोणी आणि हत्या का केली जाणून घ्या.

मुंबईमधील 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपीची कोल्हापूरमधील कारागृहामध्ये निर्घूण हत्या करण्यात आली आहे. ज्या बॉम्ब ब्लास्टने मुंबई हादरली होती, अनेक निष्पाप लोक या ब्लास्टमध्ये बळी ठरले होते. या बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या मोहम्मद अली खान उर्फ ​​मनोज कुमार भंवरलाल गुप्ता याची डोकं फोडून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. रविवारी पाच जणांनी मिळून मोहम्मद अली खानचा खून केला. या हत्येनंतर पोलिसांनी इतर आरोपींच्या सुरक्षेमध्ये वाढ केली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटामधील चार आरोपींनी कोल्हापूर कारागृहात ठेवण्यात आलं आहे. यामधील मोहम्मद अली खान यांना दुसऱ्या एका प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये असलेले पाच जण एकाच तुरूंगात होते. पाच जणांनी मोहम्मद अली खान याचं डोकं फोडत त्याला संपवलं. प्रतीक पाटील, दीपक खोत, संदीप चव्हाण, ऋतुराज इनामदार आणि सौरभ सिद्ध अशी हत्या करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. कारागृह विभागाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी याबाबत माहिती दिली.

मोहम्मद अली खान यांची हत्या झाल्याने पोलिसांनी कारागृहात बंद असलेल्या इतर आरोपींच्या सुरक्षेत वाढ केली आहे. आरोपींनी हा खून का केला? या खूनामागचा त्यांचा हेतू काय होता? एकाच तुरूंगात असताना त्यांच्यात काही वाद झालेला का? याचा तपास आता पोलीस करत असल्याचं स्वाती साठे यांनी सांगितलं. पोलिसांनी पाच आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी कोल्हापूर कारागृहात मृत आरोपी मोहम्मद अली खान उर्फ ​​मुन्ना उर्फ ​​मनोज कुमार भंवरलाल गुप्ता जन्मठेपेची शिक्षा भोगत होता.

दरम्यान, मुंबईसाठी 12 मार्च 1993 हा काळा दिवस होता, हा दिवस आठवला तरी अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. या दिवशी मुंबईमध्ये त 12 ठिकाणी 13 बॉम्बस्फोट झाले होते. या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये 257 लोकांचा मृत्यू झाला होता तर 713 जखमी झाले होते. पहिला स्फोट हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या 28 मजली इमारतीच्या तळघरात, अर्ध्या तासानंतर दुसऱ्या कारमध्ये त्यानंतर एकामागोमाग एक अशी स्फोटांची मालिका सुरू होती. या साखळी बॉम्बस्फोटाने मुंबई हादरून गेली होती.

Leave a Comment