आयआयटी मुंबईने रामायणावर आक्षेपार्ह नाटक केल्याच्या प्रकरणात चौकशीनंतर अखेर विद्यार्थ्यांना मोठा दंड ठोठावला आहे. 31 मार्च रोजी आयआयटी मुंबईच्या वार्षिक कला महोत्सवात हे नाटक सादर करण्यात आले..
मुंबई आयआयटीत काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांनी ‘राहोवन’ नावाचे नाटक सादर केल्याने खळबळ उडाली होती. या नाटकात राम आणि सीतेचे पात्र साकारणाऱ्या तरुणांच्या वेशभूषा आणि संवाद यावरुन राम आणि सीतेचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात मुंबई आयआयटी व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना तब्बल 1.2 लाखांचा दंड ठोठावण्याची नोटीस पाठविली आहे. हे नाटक मुंबई आयआयटीच्या वार्षिक गॅदरींगमध्ये सादर करण्यात आले होते. यात सीता आणि राम यांच्या वेशातील पात्रांमुळे राम आणि सीतेचा अपमान झाल्याची तक्रार अन्य विद्यार्थी गटाने केली होती. तर या नाटकाला पाठींबा देणाऱ्यांचे मत हे नाटक प्रगतीशील नाटक होते.
रामायणावर आधारीत आक्षेपार्ह नाटक वार्षिक कलामहोत्सवात सादर केल्याच्या आरोपावरून आयआयटी मुंबईने विद्यार्थ्यांना मोठा दंड ठोठावला आहे. हे नाटक आयआयटी मुंबईच्या वार्षिक महोत्सवात सादर करण्यात आले होते. नाटकात राम-सीतेचा अपमान केल्याचा आरोप काही विद्यार्थी संघटनांनी केला होता. आयआयटी मुंबई प्रशासनाने केलेल्या चौकशीनंतर या प्रकरणी विद्यार्थ्यांना मुंबई आयआयटी दोषी मानत त्यांना तब्बल 1.2 लाखांच्या दंडाची नोटीस पाठविली आहे. आयआयटी मुंबईचे विद्यार्थ्यांनी ‘राहोवन’ या नावाचे नाटक वार्षिक कला महोत्सवात सादर केले होते. या नाटकाबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या नाटकात विद्यार्थ्यांनी राम आणि सीतेची पात्रे आक्षेपार्ह पद्धतीने दाखवल्याचा आरोप आहे. मात्र, काही विद्यार्थ्यांनी या नाटकात काही आक्षेपार्ह नसल्याचे म्हटले होते. हे नाटक प्रगतीशील होते, त्याचे सर्वांनी कौतुक केल्याचे या विद्यार्थ्यांचे मत होते.
शिस्तपालन समितीची बैठक
हे नाटक महोत्सवात सादर झाल्यानंतर काही विद्यार्थी संघटनांनी या नाटकाबाबत तक्रार केली. या नाटकामुळे आपली संस्कृती आणि धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे या तक्रारी या विद्यार्थी संघटनेने म्हटले आहे. या तक्रारींनंतर शिस्तपालन समितीची बैठक बोलावण्यात आली होती. ज्या विद्यार्थ्यांविरोधात तक्रारी करण्यात आल्या होत्या, त्यांनाही या बैठकीत बोलावण्यात आले होते. त्यानंतर दोन्ही बाजूंची म्हणणे ऐकून घेण्यात आले. त्यानंतर बराच विचारविनिमय केल्यानंतर समितीने कठोर कारवाईची शिफारस केली आहे. या कारवाईत आता सिनियर विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी 1.2 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ज्युनिअर विद्यार्थ्यांना प्रत्येकी 40 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. शिवाय वसतिगृहाच्या सुविधांपासूनही वंचित ठेवण्यात आले आहे. याप्रकरणी सात विद्यार्थ्यांना शिक्षा झाल्याचे म्हटले जात आहे. आयआयटी मुंबईने विद्यार्थ्यांवरील या कारवाईवर कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला आहे.