मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबलचे मोबाईल गुंडांनी पळवले, पाठलाग केल्यावर विषारी इंजेक्शन दिले…

Mumbai Crime News: पवार त्या गुंडांच्या मागे काही आंतर गेले. त्यानंतर एका टोळक्याने त्यांना घेरले. त्यांना मारहाण केली. त्यांच्या शरीराला विषारी इंजेक्शन टोचले. तसेच लाल रंगाचे लिक्वीड त्यांच्या तोंडावर फेकले. त्यामुळे पवार त्या ठिकाणीच बेशुद्ध झाले. त्यांनी त्या ठिकाणी असलेल्या काही जणांनी रुग्णालयात दाखल केले..

चोरटे, गुंडामध्ये पोलिसांची दहशत राहिली नाही. पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचे मोबाईल लांबवण्याची हिंमत त्यांच्यात आली. त्यानंतर पाठलाग करणाऱ्या पोलिसाला गुंडाच्या टोळक्याने घेरुन मारहाण केली. विषारी इंजेक्शन दिले. या घटनेत उपचार सुरु असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांबाबत असे प्रकार घडत असतील तर सर्वसामान्य लोकांची काय परिस्थिती असणार? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असा पळवला मोबाईल

मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले 30 वर्षीय कांस्टेबल विशाल पवार ठाणे शहरात राहतात. 28 एप्रिल रोजी रात्री 9.30 वाजता ड्यूटी संपवून लोकलने घरी जात असताना ही घटना घडली. ते साध्या कपड्यांमध्ये होते. लोकल माटुंगाजवळ असताना स्लो झाली. त्यावेळी एका गुंडाने त्यांचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मोबाईल खाली रेल्वे ट्रॅकवर पडला. तो गुंड मोबाईल उचलून घेऊन पळू लागला. कॉन्स्टेबल पवार यांनी त्याचा पाठलाग सुरु केला.

गुंडांकडून घेरुन मारहाण

पवार त्या गुंडांच्या मागे काही आंतर गेले. त्यानंतर एका टोळक्याने त्यांना घेरले. त्यांना मारहाण केली. त्यांच्या शरीराला विषारी इंजेक्शन टोचले. तसेच लाल रंगाचे लिक्वीड त्यांच्या तोंडावर फेकले. त्यामुळे पवार त्या ठिकाणीच बेशुद्ध झाले. त्यांनी त्या ठिकाणी असलेल्या काही जणांनी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली.

दुसऱ्या दिवशी ते शुद्धीवर आले. रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा प्रकृती अधिकाच बिघडली. परंतु उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. मृत्यूपूर्वी पोलिसांनी रुग्णालयात त्यांचा जबाब नोंदवला होता. यानंतर अज्ञात चोरट्यांविरुद्ध आणि अमली पदार्थांचे व्यसन करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हे प्रकरण रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.

Leave a Comment