मंत्र्याचा पीएसचा नोकर, ईडीला घरात मिळाली कोट्यवधींची रोकड, नोटा मोजण्यासाठी मागवल्या मशीन,,,,,

 ईडीने फेब्रुवारी 2023 मध्ये झारखंड ग्रामीण विकास विभागाचे मुख्य अभियंता वीरेंद्र के राम यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. वीरेंद्र याला अटक करण्यात आली. ईडी एका लाच प्रकरणाचा तपास करत होती. त्यादरम्यान ईडीला काही लिंक सापडल्या. त्या मंत्री आलमगीर आलम यांच्याशी संबंधित होत्या.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार आणि प्रक्रिया सुरु आहे. त्याचवेळी अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) मोठे यश मिळाले आहे. झारखंड सरकारमधील मंत्री आलमगीर आलम यांचे खासगी सचिव सचिव संजीव लाल याच्या नोकराचा घरी खजीना मिळाला आहे. नोटांचा हा डोंगर पाहून ३० कोटींपेक्षा जास्त रक्कम असण्याचा अंदाज अधिकाऱ्यांना आहे. ईडीला छाप्यात मिळालेल्या या रक्कमेनंतर आता नोटी मोजण्यासाठी मशीन मागवले आहे. दरम्यान, या प्रकारानंतर भाजप आक्रमक झाला असून काँग्रेसवर हल्ला केला आहे.

काँग्रेसचे बडे नेते आहेत आलम

आलमगीर आलम हे काँग्रेसचे बडे नेते आहेत. ते झारखंडमधील चंपाई सोरेन सरकारमध्ये मंत्री आहेत. यापूर्वी हेमंत सोरेन सरकारमध्ये ते मंत्री होते. ते विधानसभा अध्यक्षसुद्धा राहिले आहेत. आलमगीर आलम साहिबगंज जिल्ह्यातील आहेत. झामुमो, काँग्रेस आणि आरजेडी सरकारमध्ये आलमगीर ताकतवर नेते आहेत. त्यांच्या पक्षातील काही नेत्यांच्या विरोधानंतर त्यांना मंत्री केले गेले.

अशी मिळाली लिंक

ईडीने फेब्रुवारी 2023 मध्ये झारखंड ग्रामीण विकास विभागाचे मुख्य अभियंता वीरेंद्र के राम यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. वीरेंद्र याला अटक करण्यात आली. ईडी एका लाच प्रकरणाचा तपास करत होती. त्यादरम्यान ईडीला काही लिंक सापडल्या. त्या मंत्री आलमगीर आलम यांच्याशी संबंधित होत्या. त्यांच्या मंत्रालयात भ्रष्टाचार सुरू असून हा पैसा नोकरांच्या घरी जात असल्याची माहिती ईडीला मिळाली होती. यानंतर ईडीने आलमगीरच्या पीएस संजीव लाल याचे नोकर जहांगीर याच्या घरावर छापा टाकला आणि तिथे इतकी रोकड पाहून आश्चर्यचकित झाले.

काँग्रेस खासदाराकडे मिळाले होते 350 कोटी

गेल्या वर्षी डिसेंबरमध्येही झारखंडमध्ये काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि उद्योगपती धीरज साहू यांच्या घरातून 350 कोटी रुपयांहून अधिक रोख जप्त केले होते. याला उत्तर देताना त्यांनी छाप्यात जप्त केलेली रोकड माझ्या दारू कंपन्यांची असल्याचे सांगितले. दारूचा व्यवसाय केवळ रोखीने चालतो आणि त्याचा काँग्रेस पक्षाशी काहीही संबंध नाही.

Leave a Comment