भारताच्या नव्या SMART मिसाइलच यशस्वी परीक्षण करण्यात आलं. हे स्मार्ट मिसाइल काय आहे? हे नाव का देण्यात आलय? हे मिसाइल काय-काय करु शकतं? देशाच्या सैन्याला याचा कसा फायदा होईल? चीन-पाकिस्तानला टार्गेट करता येईल का? जाणून घ्या त्या बद्दल….
भारतीय संऱक्षण आणि विकास संस्था (DRDO) ने 1 मे 2024 रोजी कलाम बेटावर स्मार्ट मिसाइलच यशस्वी परीक्षण केलं. हे मिसाइल दिसायला जितकं सुंदर आहे, तितकच धोकादायक आहे. ही एक लांब पल्ल्याची सुपरसॉनिक एंटी-सबमरीन मिसाइल आहे. या मिसाइलच्या नाकामध्ये 50 किलोपर्यंत स्फोटक फिट केली जाऊ शकतात. या मिसाइलच नाव सुपरसॉनिक मिसाइल असिस्टेड रिलीज ऑफ टॉरपीडो आहे. हे एक टॉरपीडो आहे. याला मिसाइलचा स्पीड आणि ताकद देण्यात आलीय. या टॉरपीडोच्या सहाय्याने समुद्रात शत्रुच्या जहाजाला, पाणबुडीला जलसमाधी देता येऊ शकते.
SMART मिसाइल सध्या BEML-Tatra TEL ट्रकवरुन डागता येऊ शकतं. तसच नौदलाच्या कुठल्याही युद्ध जहाजावर तैनाती करता येऊ शकते. तिथल्या वर्टिकल लॉन्च सिस्टमवरुन शत्रुवर हे मिसाइल डागता येईल. याच्या वॉरहेडमध्ये हाय एक्सप्लोसिव असतात. हे मिसाइल धडकल्यानंतर मोठा स्फोट होईल.
या मिसाइल खास वैशिष्ट्य काय? शत्रूला काय कळणार नाही?
या मिसाइलमध्ये दोन स्टेज सॉलिड रॉकेट इंजिन आहे. इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणारी ही टॉरपीडो आहे. सॉलिड फ्यूल आणि सिल्वरजिंक बॅटरीने पुढे जाण्यासाठी ताकद मिळते. SMART मिसाइलची रेंज 643+20 km आहे. म्हणजे मिसाइल 643 किलोमीटरपर्यंत सुपरसॉनिक स्पीडने जाईल. त्यानंतर टॉरपीडो या स्पीडचा फायदा उचलून 20 किलोमीटर पाण्याच्या आतापर्यंत जाऊ शकते. त्यामुळे शत्रूला कळणारच नाही की, मिसाइलने हल्ला होतोय की, टॉरपीडोने. 1234 km/hr वेगाने हे अस्त्र शत्रुच्या दिशेने जाईल.
हवेतच टार्गेट बदलणं शक्य
हे स्मार्ट मिसाइल मिड कोर्स इनर्शियल नेविगेशन सिस्टमवर चालतं. म्हणजे मध्येच टार्गेट बदलाताही येतं. स्पीड कमी-जास्त करता येतो. त्यासाठी डेटालिंक पाठवाव लागेल.