बर्फाच्या लादीत आढळला मेलेला उंदीर….

बर्फाच्या लादीमध्ये मेलेला उंदीर सापडला असतानाही त्यांनी तोच बर्फ इतर व्यवसायिकांना विकल्याची धक्कादायक घटना बेल्हे येथे घडली.

आळेफाटा – बेल्हे (ता. जुन्नर) या ठिकाणी एक सरबत, ज्यूस व बर्फाचे गोळे बनवणारा व्यवसायिक राजेश निषाद यांनी आणलेल्या बर्फाच्या लादी मध्ये मेलेला उंदीर सापडला असतानाही त्यांनी तोच बर्फ इतर व्यवसायिकांना विकल्याची धक्कादायक घटना बेल्हे येथे घडली.

सदर मेलेल्या उंदरामुळे उसाचा रस, बर्फाचा गोळा, बर्फाचा लिंबू सरबत इत्यादी पिण्यामुळे लहान मुले व प्रवाशांना त्रास झाल्यास त्याला जबाबदार कोण? बर्फ बनविणाऱ्या कारखान्यामध्ये होत असलेला हलगर्जीपणा किंवा राजेश निषाद यांनी आणलेला बर्फ साठवून ठेवलेल्या ठिकाणी नसलेली स्वच्छता व त्या ठिकाणी असलेला उंदीर-घुशी यांचा वावर यामुळे त्या बर्फाच्या लादीत उंदीर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे असतानाही सदर बर्फ विकण्याचे काम चालू होते.

सध्या कडक असा उन्हाळा चालु असल्याने दुचाकी किंवा चारचाकीमधून प्रवास करताना घशाला सारखी कोरड पडत असते, पर्यायाने रस्त्याच्या कडेला असणारे लिंबू पाणी, सरबत, नीरा स्टाॕल, उसाचा रस लक्ष वेधून घेतात व एकाच वेळी दोनदोन ग्लास रीचवून आपण पुढच्या प्रवासाला निघतो पण लिंबू पाण्यातले व सरबताचे पाणी कशाचे आहे, कोठून आणले आहे, त्यात साखरच आहे का? किंवा त्यात सॕक्रीनसारखा पदार्थ मिसळला आहे.

तसेच बर्फ बनविताना वापरलेले पाणी शुद्ध होते का? बर्फ साठविण्याची जागा चांगली आहे का? त्याठिकाणी मोकाट कुत्री, डुकरे येऊन बसतात का? लिंबू पाणी किंवा सरबत बनविणा-याच्या हाताला काही जखमा झालेल्या आहेत का? त्यापासून आपल्याला व बरोबर असणाऱ्या लहान बालकांना काही संसर्ग होईल का? यापैकी एकाही गोष्टींचा आपण विचार न करता डोळे झाकून पिऊन टाकता.

याविषयी संबधित खात्याने लक्ष घालणे गरजेचे आहे आणि जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा अधिकार यांना कोणी दिला, तेंव्हा रस्त्यावरील लिंबू पाणी, बर्फ घातलेला उसाचा रस,आकर्षक बाटल्यामधील सरबत व नीरा पिताय पण सावधान जरा जपूनच, कारण आपले आरोग्य आपणच सांभाळले पाहिजे.

  1. स्वच्छता: खात्याने लक्ष घेण्याचा सर्वात महत्त्वाचा अंश आहे. स्वच्छता जगभरातील आरोग्यासाठी महत्त्वाची आहे. स्वच्छता वाढविण्यासाठी, बर्फ बनविण्यासाठी वापरलेले पाणी परीस्थितीशी सुमारे असणे आवश्यक आहे.
  2. स्वास्थ्याची काळजी: बर्फाच्या लादीत आढळलेला मेलेला उंदीर सर्वांच्या आरोग्याला धोका आहे. त्याचे प्रभाव अनेक लोकांना झाले आहे. स्वास्थ्याची काळजी घेत अशा क्रूर घटनांपासून सावध राहावे.
  3. गुणस्तरीय उत्पादन: बर्फ बनविण्यात वापरलेले पाणी उत्पादन प्रक्रियेत शुद्ध असले पाहिजे. या पाण्यात किंवा त्यांच्या वापरात कोणताही अपशिष्ट पदार्थ असले नाहीत.

आपल्या स्वास्थ्याला कायम ठेवण्याच्या साठी सावधानी अजून मोठ्या मोठ्या अंगठ्यांच्या माध्यमातून आपल्या स्वास्थ्याला सुरक्षित ठेवण्याची गरज आहे. आपल्या आरोग्याला सांभाळण्यासाठी स्वस्थ आणि सुरक्षित आहार निवडण्याची गरज आहे, ज्यामुळे आपण आपल्या आरोग्याला कायम संरक्षित ठेवू शकतो.

धन्यवाद,

Leave a Comment