पुण्यात मन सुन्न करणारी घटना, 1600 मीटरचे तीन राऊंड पूर्ण अन् शेवटी तरूणाचा मृत्यू, काय घडलं?

राज्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरू असून पुण्यामधून मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. तरूणाने 1600 मीटरचे राऊंड पूर्ण केले पण चौथ्या राऊंडला असं काय झालं की त्याचा मृत्यू झाला. जाणून घ्या.

राज्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरू असून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खाकीचं स्वप्न घेऊन पळत असलेल्या तरूणाचा चक्कर येऊन तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. 400 मीटरचे तीन राऊंड झाल्यावर शेवटचा राऊंड पूर्ण करत असताना त्याच्या त्याच्या पायात क्रँम्प आला. त्यानंतर चक्कर येऊन तो खाली कोसळला. त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तुषार बबन भालके (वय 27) असं मृत्यू झालेल्या तरूणाचं नाव आहे.

आज सकाळी 8 वा या युवकाने रनिंगचे तीन राऊंड पूर्ण केले पण धावत असताना त्याच्या पायात क्रँम्प आला, मस्सल ब्रेक झाले आणि तो पडला. र्ती अधिकाऱ्यांनी तात्काळ त्याला अँम्ब्युलन्समधून ससूनला नेलं पण डिहायड्रेशन होऊन प्रथम त्याच्या किडनी फेल झाल्या आणि मग ह्रदय बंद पडलं. मल्टिपल ऑर्गन फेलुअर होऊन त्याचा उपचारादरम्यान दूर्दैवी अंत झाला.

पोलीस भर्ती दरम्यान युवकाचा दुर्दैवी अंत होण्याची राज्यातली ही तिसरी घटना आहे. यापूर्वी एसआरपीएफच्या भर्तीत मुंबईत दोन युवक दगावलेत त्यानंतर आज पुण्यात हा तिसरा प्रकार घडलाय. मयत युवकाचं नाव तुषार भालके असून तो मूळचा संगमनेर तालुक्यातील कोठे गावचा रहिवासी आहे.

राज्यात 19 जूनपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरु झाली. एकूण 17 हजार 471 जागांसाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज आले आहेत. बँड्समन पदाच्या 41 जागा, तुरुंग विभागात शिपाई पदाची जागा, चालक पदाच्या 1686 जागा, पोलीस शिपाई पदाच्या 9595 जागा तर शीघ्र कृती दलासाठी 4 हजार 349 जागांसाठी राज्यातील उमेदवार भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होत आहे.

नवी मुबंई पोलीस शिपाई संवर्गातील १८५ पदांसाठीची भरती प्रक्रियेचा दूसरा महत्वाचा टप्पा म्हणजे लेखी परिक्षा रविवारी ७ जुलैला नवी मुंबईतील वाशी येथील ‘सिडको एक्झीबीशन सेंटर’मध्ये होणार आहे. रविवारी सकाळी साडेनऊ ते साडेदहा या दरम्यान ही परिक्षा होणार असली तरी पात्र उमेदवारांनी परिक्षा केंद्रावर सकाळी ७ वाजता उपस्थित राहण्याची सूचना नवी मुंबई पोलीसांतर्फे करण्यात आली आहे. या लेखी परिक्षा केंद्राच्या आत आणि बाहेर सीसीटिव्ही कॅमेरांच्या माध्यमातून उमेदवारांवर बारीक लक्ष्य ठेवण्यात येणार आहे

Leave a Comment