नागपाडा आणि डोंगरी हा भाग अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा गड मानला जायचा. त्याच्या याच पूर्वीच्या गडमध्ये अजूनही ड्रग्ज तस्करीसारखे कूकृत्य सुरु असल्याचा खुलासा झाला झालाय. पण या परिसरात घुसून ऑपरेशन करत एनसीबी अधिकाऱ्यांनी नुकतंच तब्बल 60 कोटी रुपये किंमतीचे 31 किलो मैफेड्रोन ड्रग्स जप्त केले आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकर जिथे मोठा झाला त्या डोंगरीत एनसीबीचं पथक घुसलं. या एनसीबीच्या पथकाने डोंगरीत मेगा ऑपरेशन केलं. या ऑपरेशनमध्ये तब्बल 60 कोटींचा ड्रग्ज साठा पकडण्यात आला आहे. एनसीबी अधिकाऱ्यांनी या कारवाईतून 3 आरोपींना अटक केली आहे. आरोपींसोबत आणखी कोण-कोण आहेत, ते ड्रग्जची तस्करी कशी आणि कुणाकडून करत होते? याची माहिती आता तपासातून समोर येईल. विशेष म्हणजे एनसीबीच्या पथकाकडून गेल्या अनेक दिवसांपासून ऑपरेशन सुरु होतं. त्यांच्या ऑपरेशनला आता यश आलेलं आहे. एनसीबीचे झोनल डायरेक्टर अमित घावटे यांनी या कारवाईबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
नागपाडा आणि डोंगरी हा भाग अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा गड मानला जायचा. त्याच्या याच पूर्वीच्या गडमध्ये अजूनही ड्रग्ज तस्करीसारखे कूकृत्य सुरु असल्याचा खुलासा झाला झालाय. पण या परिसरात घुसून ऑपरेशन करत एनसीबी अधिकाऱ्यांनी नुकतंच तब्बल 60 कोटी रुपये किंमतीचे 31 किलो मैफेड्रोन ड्रग्स जप्त केले आहे. ड्रग्ज अधिकाऱ्यांनी या प्रकरणी तीन जणांना अटकही केली आहे. आरोपी मुशर्रफ जेके याच्याकडून ड्रग्ज तस्करीचं रॅकेट चालवलं जात होतं. या आरोपीकडे 10 किलो मेफेड्रोन ड्रग्ज मिळालं. त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता नौशीन नावाच्या महिलेच्या खोलीतून 10.5 किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आला. तिला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली असता तिने दिलेल्या माहितीच्या आधारावर सैफ नावाच्या आरोपीला 11 किलोग्राम मेफेड्रोन ड्रग्जसह पकडण्यात एनसीबीला यश आलं.
एनसीबीचे झोनल डायरेक्टर काय म्हणाले?
“26 जूनच्या संध्याकाळी ऑपरेशन झालं. या ऑपरेशनमध्ये 31.5 किलो मेफेड्रोन ड्रग्ज जप्त करण्यात आलं. तसेच 69 लाख रुपयांची रोख रक्कमही जप्त करण्यात आली. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे ऑपरेशन डोंगरी आणि नागपाडा परिसरात पार पडलं. या ऑपरेशनमध्ये पकडण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत 60 कोटी रुपये इतकी आहे”, अशी माहिती एनसीबीचे झोनल डायरेक्टर अमित घावटे यांनी दिली.
“खूप आव्हानात्मक हे ऑपरेशन होतं. हे दोन्ही परिसर हे संवेदनशील आहेत. तिथे कारवाई करताना अनेकदा अडचणी येतात. याशिवाय परिसरात खूप पाऊस पडत होता. पण तरीही आम्ही प्रयत्न करत राहिलो. ही खूप दिवसांपासूनची मेहनत होती. या मेहनतीला फळ मिळालं”, अशी प्रतिक्रिया अमित घावटे यांनी दिली. “या प्रकरणी आम्ही सर्वच अँगलने तपास करत आहोत. या प्रकरणाचा अंडरवर्ल्डशी संबंध आहे का ते आताच सांगणं कठीण आहे”, अशीदेखील प्रतिक्रिया अमित घावटे यांनी दिली.