जिंकता, जिंकता पुतिन यांना युक्रेनचा मोठा दणका, 5 मे रशियन सैन्यासाठी ठरला विनाशकारी दिवस…..

रशियन सैन्य युक्रेनमधील चासिव यार शहर जिंकण्याच्या जवळ आहे. त्याचवेळी युक्रेनने रशियाला मोठा दणका दिला आहे. सुनियोजित हल्ले करुन रशियाच मोठं नुकसान केलय. ड्रोन ब्रिगेडने एक व्हिडिओ जारी करुन काय स्थिती केलीय, ते दाखवलय.

दोन वर्षापेक्षा अधिक काळ झाला, तरी रशिया आणि युक्रेनमधील लढाई अजून थांबलेली नाहीय. दोन्ही देशांमध्ये घनघोर लढाई सुरु आहे. 5 मे चा दिवस रशियन सैन्यासाठी विनाशकारी ठरला. ईस्टर्न फ्रंटलाइनपासून रशियन शहरांवर युक्रेनी सैन्याने जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात रशियन सैन्याच एक सुखोई फायटर जेट आणि 40 पेक्षा जास्त आर्टिलरी, सैन्य वाहन आणि टँक नष्ट झाले. डोनेस्कपासून बेलगोरोदपर्यंत भीषण हल्ले झाले. युक्रेनने चासिव यार शहर वाचवण्यासाठी रशियावर हे हल्ले केले. यूक्रेनी इंटेलिजेंस एजन्सीच्या रिपोर्ट्नुसार, रशियन सैन्य चासिव यार शहर जिंकण्याच्या जवळ आहे. स्वसंरक्षणासाठी मोठा हल्ला आवश्यक होता. आता अमेरिका आणि ब्रिटनने सुद्धा युक्रेनला रशियन भूमीवर मोठे हल्ले करण्याची परवानगी दिली आहे.

5 मे रोजी सकाळी ईस्टरच्या दिवशी युक्रेनचे राष्ट्रपती जेलेंस्की यांनी युक्रेनी नागरिक आणि सैन्यामध्ये जोश भरण्यासाठी कॅथेड्रल येथून एक मोठं भाषण दिलं. याच दिवशी युक्रेनी सैन्याने ईस्टर्न फ्रंटलाइनवर बनलेल्या रशियन चौक्यांवर भीषण बॉम्बवर्षाव केला. स्पेशल मिलिट्री ऑपरेशन झोनमध्ये रशियन एअर फोर्सच Su-25 फायटर जेटमधून बॉम्ब वर्षाव करण्यासाठी पोहोचलं, त्यावेळी युक्रेनी सैन्याचे जवान स्टिंगर मॅनपॅडसह तैनात होते. त्यांनी रशियाच Su-25 फायटर जेट पाडलं.

त्याचवेळी झाला मोठा हल्ला

जीव वाचवण्यासाठी रशियन पायलट इजेक्टच बटण दाबून विमानाबाहेर पडला. पायलट जमिनीवर उतरण्याआधीच Su-25 जोरात जमिनीवर कोसळलं. त्यानंतर मोठा स्फोट झाला. 5 मे च्या सकाळी राष्ट्रपती पुतिन ईस्टरच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. मॉस्कोमध्ये हा कार्यक्रम सुरु होता. त्याचवेळी ईस्टर्न फ्रंटलाइनवर युक्रेनी सैन्याने भीषण हल्ला केला.

सुनियोजित हल्ले करुन रशियाच मोठं नुकसान

युक्रेनी ड्रोन आणि आर्टिलरीने सुनियोजित हल्ले करुन रशियाच मोठं नुकसान केलय. यूक्रेनने ईस्टर्न फ्रंटलाइनवर हल्ला करुन रशियाच MLRS BM-21 नष्ट केलं. डोनेस्कमध्ये युक्रेनी ड्रोन ब्रिगेडने रशियाच्या तीनपेक्षा अधिक टँक्सना एकाचवेळी टार्गेट केलं. यूक्रेनच्या आर्टिलरी ब्रिगेडने रशियाच्या 2C19 Msta-S सेल्फ प्रोपेल्ड आर्टिलरी गन नष्ट केली. 4 मे च्या रात्री सुद्धा युक्रेनी ड्रोन ब्रिगेडने रशियाचे अनेक टँक्स नष्ट केले. युक्रेनच्या ड्रोन ब्रिगेडने एक व्हिडिओ जारी करुन ईस्टर्न फ्रंटलाइनवर रशियन सैन्य चौक्या आणि शस्त्रास्त्रांची जी हालत झाली, ते दाखवलय.

Leave a Comment