गेल्या 48 तासांत जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी उच्छाद मांडला आहे. या दोन दिवसांत दहशतवाद्यांनी तीन हल्ले केले आहेत. सुरक्षा दलाने एका दहशतवाद्याला टिपले. काही भागात चकमक सुरु आहे. काय आहे अपडेट
जम्मू आणि काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी डोके वर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. पण सुरक्षा दलांच्या मजबूत इराद्यापुढे त्यांना नांग्या टाकाव्या लागल्या आहेत. कठुआती हिरानगर सेक्टरमध्ये लष्काराने नाकाबंदी केली आहे. एका गावात दहशतवादी शिरल्याची माहिती मिळताच लष्कराने घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही बाजूने गोळीबार झाला. त्यात एक दहशतवादी ठार झाला. एका नागरिकाला पण गोळी लागली. डोडा जिल्ह्यातील काही भागात दहशतवादी सक्रिय असल्याचे दिसून आले. त्याठिकाणी सुरक्षा दलाने दहशतवाद्यांवर ताबडतोब हल्ले सुरु केले आहेत.
गेल्या 48 तासांत 3 हल्ले
डोडा जिल्ह्यात दहशतवाद पसरविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. गेल्या 48 तासांत 3 हल्ले करण्यात आले आहे. दहशतवाद्यांनी पोलीस चौक्या, ग्रामीण भागातील नागरीक आणि पर्यटकांना लक्ष करण्याचा प्रयत्न केला आहे. डोडा जिल्ह्यातील काही भागात रात्रीच्यावेळी सुरक्षा दलासोबत दहशतवाद्यांची चकमक झाली. त्यात 6 जवान जखमी झाले. राष्ट्रीय रायफल युनिटचे 5 तर एसपीओचा एक जवान जखमी झाला आहे. पण सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना पळता भूई थोडी केली आहे..
जम्मू आणि काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी डोके वर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. पण सुरक्षा दलांच्या मजबूत इराद्यापुढे त्यांना नांग्या टाकाव्या लागल्या आहेत. कठुआती हिरानगर सेक्टरमध्ये लष्काराने नाकाबंदी केली आहे. एका गावात दहशतवादी शिरल्याची माहिती मिळताच लष्कराने घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही बाजूने गोळीबार झाला. त्यात एक दहशतवादी ठार झाला. एका नागरिकाला पण गोळी लागली. डोडा जिल्ह्यातील काही भागात दहशतवादी सक्रिय असल्याचे दिसून आले. त्याठिकाणी सुरक्षा दलाने दहशतवाद्यांवर ताबडतोब हल्ले सुरु केले आहेत.
गेल्या 48 तासांत 3 हल्ले
डोडा जिल्ह्यात दहशतवाद पसरविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. गेल्या 48 तासांत 3 हल्ले करण्यात आले आहे. दहशतवाद्यांनी पोलीस चौक्या, ग्रामीण भागातील नागरीक आणि पर्यटकांना लक्ष करण्याचा प्रयत्न केला आहे. डोडा जिल्ह्यातील काही भागात रात्रीच्यावेळी सुरक्षा दलासोबत दहशतवाद्यांची चकमक झाली. त्यात 6 जवान जखमी झाले. राष्ट्रीय रायफल युनिटचे 5 तर एसपीओचा एक जवान जखमी झाला आहे. पण सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना पळता भूई थोडी केली आहे.